Home /News /maharashtra /

मराठा आंदोलकांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा... छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

मराठा आंदोलकांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा... छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

मराठा समाजात नाराजी पसरली आहे. मराठा बांधव आक्रमक झाला असून त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर: सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला (Maratha reservation) स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे. मराठा बांधव आक्रमक झाला असून त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, पोलिसांनी नाशिक आणि पुण्यात मराठा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (MP Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (HM Anil Deshmukh) यांना पत्र लिहिलं आहे. हेही वाचा... संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व करावं, शिवसेना खासदाराचं साकडं मराठा आंदोलकांना नोटीस बजावल्या जात आहेत राज्य सरकारनं हे तात्काळ थांबवावं, अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मराठा संघटना आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. मात्र, पोलिस प्रशासनानं मराठा आंदोलकांना फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. तसेच न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. प्रशासनानं सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी. असं खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटलं आहे. संभाजीराजेंनी पत्र... 'मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावने सुरू केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करून आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. हेही वाचा...शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय, सदाभाऊंनी केली राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेंव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतः साठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे. न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्याउपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी.'
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Udhav thackeray

    पुढील बातम्या