आमदार बच्चू कडू यांनी कंगना रणौतची उडवली जोरदार खिल्ली, म्हणाले....

कंगना रणौतला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे.

कंगना रणौतला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे.

  • Share this:
अमरावती, 16 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut)हिच्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानं देखील तिला महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत जरी उभं केलं तरी ती निवडून येणार नाही. एवढंच नाही तर तिचं डिपॉझिट देखील जप्त झाल्याशिवाय नाही, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कंगनाची खिल्ली उडवली आहे. हेही वाचा...दिशाच्या 'लिव्ह इन पार्टनर'चा जबाब महत्त्वाचा, नितेश राणेंच अमित शहांना पत्र आमदार बच्चू कडू यांनी कंगनानंतर भाजपवरही निशाणा साधला आहे. एखाद्या अभिनेत्रीला हाताशी धरून भाजप राजकारण करीत आहे. हे घाणेरड राजकारण करणे चुकीचे आहे. कंगना रणौतला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे. एखाद्या अभिनेत्रीनं उलट सूलट आरोप केल्यानंतर राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शिवसेनाचा वाघ तिथं बसला आहे, असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. दुसरीकडे, 'सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, ' असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याची पाठराखण करण्यात आली आहे. हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. हेही वाचा...नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या... जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. 'ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.' जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.' असं म्हणत सेनेनं पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: