सोनिया गांधींनी तयार केली काँग्रेसची कोअर कमिटी; या 5 नेत्यांचा समावेश
पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतल्या 5 जणांची विशेष समिती तयार केली आहे.
पी चिदंबरम, दिग्विजय सिंग, जयराम रमेश, अमर सिंग, गौरव गोगाई या समितीत असतील.
सरकार निर्णय त्यावर पक्षाची भूमिका ठरवणे तसंच इतर राजकीय विषयांवर भूमिका ठरवण्याचं काम ही कोअर कमिटी करेल.