Home /News /maharashtra /

कोरोनाचा विस्फोट! राज्यात ऑक्सिजनच्या काळा बाजारावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितली 'वस्तुस्थिती'

कोरोनाचा विस्फोट! राज्यात ऑक्सिजनच्या काळा बाजारावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितली 'वस्तुस्थिती'

मुंबई, 16 सप्टेंबर: देशात कोरोनाचा (coronavirus) विस्फोट झाला आहे. त्यात राज्यात मृत्यू आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister rajesh tope) यांनी सांगितलं की, पुणेसह सहा ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सुरू करणार आहेत. ऑक्सिजनचा काळा बाजार... राज्यात काही शहरात ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकांना 19 रुपयांपेक्षा जास्त दरात कोणी ऑक्सिजनची विक्री करत असेल तर औषध प्रशासन विभाग तक्रार करावी. काळा बाजार करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुढील काळात ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी नवीन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हेही वाचा...देशात कोरोनाच्या रुग्णांनी गाठला 50 लाखांचा टप्पा, वाचा 24 तासांतली आकडेवारी राज्सात काही ठिकाणी पुणे, नागपूर शहरात आयसीयू व्हेनेटिलेटर बेड मिळत नाही, हे खरे आहे. मुंबईत मात्र, अशी परिस्थती नाही. खासगी रूग्णालयात जास्त पैसे देऊन काही लोक बेड अडवून ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आरोग्य विभाग यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात डीपीडीसी आणि आमदार खासदर फंड यातून आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यास प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असेही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं बरे झालेल्या 4 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण... अहमदाबाद, नोएडा नंतर आता मुंबईमध्ये चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहून डॉक्टरी हैराण झाले आहे. कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर पुन्हा हा संसर्ग उलटून आला. नोएडा इथे दोन तर मुंबईतील चार रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील सीएसआयआरच्या इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) च्या संशोधनात पुन्हा संसर्ग झाल्याचं समोर आलं. मुंबईतील नायर रुग्णालयातील तीन तर हिंदुजा रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. सहा दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात माहिती प्रकाशित करण्यात आली होती. IGIB ने केलेल्या 16 जणांवर केलेल्या रिसर्चमध्ये नोएडामधील दोन तर मुंबईतील 4 आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं रुपही बदलल्याचं पाहायला मिळालं. 17 मे रोजी या आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांनी म्हणजेच 21 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरला कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग झालेले 6 आरोग्य कर्मचारी मिळाले त्यामध्ये मुंबईतील 4 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यानं आता मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. हेही वाचा...पुण्यातील 'या' तालुक्यात देशातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू दराचा टक्का! देशात काय आहे कोरोनाची स्थिती? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 90 हजाप 123 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवार 1290 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 82 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त आणि कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या 39 लाख आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Rajesh tope, Symptoms of coronavirus, World After Corona

पुढील बातम्या