• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ठरलं तर मग! आता मुख्यमंत्रीही घराबाहेर पडणार, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

ठरलं तर मग! आता मुख्यमंत्रीही घराबाहेर पडणार, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना! अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे.

  • Share this:
मुंबई, 17 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना! अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृतीतून उत्तर दिलं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी (19 ऑक्टोबर) मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत. हेही वाचा...80 वर्षांचे शरद पवार अ‍ॅक्शनमध्ये, अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी मुख्यमंत्री 19 ऑक्टोबरला राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहाणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील. सोलापूरहून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्द येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. बोरी उमरगे येथील पाहाणी केल्यानंतर मुखमंत्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच अभ्यागताच्या भेटी घेतील. सायंकाळी सोलापूरहून विमानानं मुंबईकडे रवाना होतील. असा असणार मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तं भागांचा दौरा... दिनांक 19.10.2020 सकाळी 08:00 वा.-सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण सकाळी 09:00 वा.-सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण (8 कि.मी.) सकाळी 09:15 वा.-शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव सकाळी 09:30 वा.-सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) (50 कि.मी.) सकाळी 10:45 वा.- सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा सकाळी 11:00 वा.- सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी सकाळी 11:15 वा.- अक्कलकोट शहरकडे प्रयाण (7 कि.मी.) सकाळी 11:30 वा.- अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी सकाळी 11:45वा.- अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण (5 कि.मी.) दुपारी 12:00 वा. - रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी दुपारी 12:15 वा.- रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण (05 कि.मी.) दुपारी 12:30 वा.- बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी दुपारी 12:45 वा.- बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण (60 कि.मी.) दुपारी 02:00 वा.- शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव हेही वाचा..कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुन्हा चाचण्या कमी! फडणवीसांचं CM यांना पत्र दुपारी 03:00 वा.- पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी दुपारी 03:30 वा.- शासकीय विश्रामगृह येथून सोलापूर विमानतळाकडे प्रयाण दुपारी 03:45 वा.- सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण सायं. 05:00 वा.- मुंबई विमानतळ येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण
Published by:Sandip Parolekar
First published: