Home /News /maharashtra /

महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक, दिल्ली हिंसाचारावरून नरेंद्र मोदींना दिली धमकी

महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक, दिल्ली हिंसाचारावरून नरेंद्र मोदींना दिली धमकी

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अर्थात (CID) संकेतस्थळ (Website) हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

  मुंबई,6 मार्च:महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अर्थात (CID) संकेतस्थळ (Website) हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून (5 मार्च) CIDची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. THE GOVERNMENT OF IMAM MAHDI नावाने वेबसाईट हॅक करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला हॅकर्सनी धमकी दिली आहे. मुस्लिमांवरील अत्याचार थांबवा नाही तर भोगावे घातक परिणाम लागतील. डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते तेव्हा झालेल्या हिंसाचाराचा हॅकिंग मॅसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम सर्वत्र आहेत याचे भान राहू द्या, अशी धमकीही देण्यात आली आहे. दुसरीकडे, CID ची वेबसाइट सध्या सुरळीत सुरू असून सीआयडीच्या वेबसाईटचे नुतनीकरण सुरू आहे. वेबसाइट हॅक झालेली नाही, असे CIDच्या सुत्रांनी सांगितलं आहे. हेही वाचा..आता प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन, महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा मिळालेली माहिती अशी की, हॅकर्सनी दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा केला आहे. मोदी सरकार देशातील हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हेही वाचा..येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा दिसत होता 'हा' मेसेज.. गुगल सर्च इंजिनवर mahacid.gov.in टाकल्यानंतर हॅकर्सचा एक संदेश दिसतो. 'हिंदू जमावाकडून मुस्लिमांच्या हत्या केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत उसळलेल्या दंगलीत 45 हून अधिक जण मारले गेले आहेत. त्यात बहुतांश मुस्लीम आहेत. तर किमान दीडशे जखमी झाले आहेत,' असा संदेश कालपासून वेबसाईटवर दिसत होता. 'मुस्लिमांवरील हल्ले थांबवा, असा इशारा मोदी सरकार आणि पोलिसांनाही देण्यात आला होता. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे. ही वेबसाइट हॅक करणारे कोण आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लवकरच हे स्पष्ट होईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Breaking news, Latest news

  पुढील बातम्या