हिंगोली, 06 ऑगस्ट : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्या ताफ्यातील 3 वाहनांना हिंगोलीमध्ये (hingoli) अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात राज्यपालांच्या गाडीला कोणतीही हानी झाली नाही.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर पोहोचले होते. हिंगोलीतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यपाल परभणीकडे रवाना झाले होते. नरसी येथील नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेऊन राज्यपालांचा ताफा हा परभणीकडे रवाना झाला असता ही घटना घडली आहे.
सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील हॉटेल-बार बेमुदत बंद, पार्सल सेवाही नाही
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रोडवरील नरसी येथे ताफा पोहोचला असता राज्य महामार्गावर समोरच्या गाडीने ब्रेक मारले, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या इतर दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. पण सदर गाड्या ताफ्यात मागे होत्या. त्यामुळे राज्यपालांच्या गाडीला कोणताही हानी झालेले नाही. तर अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. काही काळ वाहतूक थांबली होती, पण त्यानंतर ताफा परभणीकडे रवाना झाला.
BREAKING : एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवली, हे आहे कारण
दरम्यान, 'मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही. जनतेच्या विकासाचे जे 3 डेव्हलपमेंट बोर्ड आहेत, त्याचे अधिकार मला संविधानाने दिले आहेत. मी जिथे जातो तिथे दोन तीन अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत चर्चा करतो तशीच चर्चा आज केली, असं राज्यपालांनी आपल्या दौऱ्याबद्दल नांदेडमध्ये असताना स्पष्ट केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.