धुळे, 10 नोव्हेंबर: दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. एवढं करून नराधम थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला बळजबरीनं विष पाजून फेकून दिलं. अखेर पीडितेचा धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी पीडितेवर पारोळा (जि. जळगाव) तालुक्यातील टोळी गावात सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. नराधमांनी तिला विष पाजून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. नंतर पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र, उपचारादरम्यान पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा..मूर्ती लहान पण कीर्ती महान: 6 वर्षाचा चिमुरडा झाला कॉम्प्युटर प्रोग्रामर
खान्देशात महिला सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रावेर येथील तीन मुलीच्या खुनाचे प्रकरण ताजं असताना आत दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी गावातील बीएसस्सीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार बलात्कार करून तिला विष पाजल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर तिला उपचारासाठी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारदरम्यान तिचा अखेर मृत्यू झाला.
पीडीत तरुणीला उचलून नेत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून पारोळा शहरात फेकून दिल्याचा आरोप मयत पीडित तरुणीच्या आईनं केला आहे. यात एका अज्ञात महिलेचाही समावेश असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, सर्व आरोपीना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे. तसेच पीडितेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
औषधं आणण्यासाठी घराबाहेर निघाली, तितक्यात...
पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळी सणासाठी ती 3 नोव्हेंबरला तिच्या भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता पीडिता औषधं आणण्यासाठी बाहेर जाते असल्याचं सांगून घराबाहेर पडली. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या मामाने 8 नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असल्याने तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.
मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केली असता ती त्यांचीच भाची होती. रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. म्हणून तिला तातडीने रुग्णवाहिकेतून धुळ्याला नेण्यात आले. धुळ्याला जात असताना तरुणी शुद्धीवर होती.
हेही वाचा..धनंजय मुंडे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती स्थिर
आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले. अत्याचार करणाऱ्या टोळी गावातील तीन तरुणांची नावेही तिने सांगितली.या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. तर एका संशयिताच्या मागावर पोलीस आहेत.