LIVE : मुंबईत थेट गणपती विसर्जनाला बंदी; पालिकाच करणार मूर्तीचं विसर्जन

आज महाराष्ट्रातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येनं 6 लाखांचा टप्पा ओलांडला. याशिवाय देशभरातल्या ताज्या माहितीचे मिनिटामिनिटांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 17, 2020, 21:08 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:36 (IST)

  नागपूर जिल्ह्यात आज तब्बल 623 कोरोना रुग्णांची नोंद
  नागपूर जिल्ह्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 14,613 वर

  21:36 (IST)

  अंधेरी पूर्वमध्ये कोरोनाग्रस्तांचा 8 हजार रुग्णांचा टप्पा पार
  8 हजारांचा टप्पा गाठणारा मुंबईतील एकमेव प्रभाग
  अंधेरी पूर्वमध्ये कोरोनाचे 8 हजार 42 रुग्ण
  अंधेरी पूर्व विभागात मृत्यूची संख्याही सर्वाधिक 484

  21:36 (IST)

  पुण्यात दिवसभरात 835 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 1049 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात 57 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
  पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74,933

  21:3 (IST)

  वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
  पेनटाकळी प्रकल्पाची सर्व 9 वक्रद्वारं 30 सें.मी.नं उघडली
  पैनगंगा नदीपात्रात 9,485 क्युसेक पाण्याचा विसर्ग
  नदीकाठावरील शेतीचं नुकसान होण्याची शक्यता

  20:54 (IST)

  सुनील इरावरला मनसेतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो -राज ठाकरे
  तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो -राज ठाकरे
  'कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजलीची वेळ येऊ देऊ नका'
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे -राज ठाकरे
  कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला -राज ठाकरे
  'लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच, हे विसरू नका'
  कोरोनामुळे उद‌्भवलेली परिस्थिती कठीण आहे -राज ठाकरे
  या काळात स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या -राज ठाकरे

  20:36 (IST)

  पंडितजी जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत -मुख्यमंत्री
  उद्धव ठाकरेंची पंडित जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  20:31 (IST)

  पंडितजी जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत -मुख्यमंत्री
  उद्धव ठाकरेंची पंडित जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  20:29 (IST)

  'भारतीय शास्त्रीय संगीत नि:शब्द झालंय'
  पंडित जसराज यांना अजित पवारांची श्रद्धांजली

  20:25 (IST)

  राज्यात आज कोरोनाचे 8,493 नवे रुग्ण
  राज्यात आज 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी
  राज्यात आज दिवसभरात 228 रुग्णांचा मृत्यू
  राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 4 हजार 358
  राज्यातील मृत्युदर 3.36 टक्क्यांवर
  आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
  ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी -राजेश टोपे

  मुंबई : महाराष्ट्रात Coronavirus चा कहर थांबण्याचं नाव घेत नाही. राज्याचा रिकव्हरी रेट 70 टक्क्यांवर पोहोचला असला, तरी नव्या रुग्णांचं निदान होणं कमी झालेलं नाही. आज महाराष्ट्रातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येनं 6 लाखांचा टप्पा ओलांडला. याशिवाय देशभरातल्या ताज्या माहितीचे मिनिटामिनिटांचे अपडेट्स

  दिवसभरात दोन मोठ्या निधनवार्ता आल्या. संगीतमार्तंड जसराज आणि चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं. महाराष्ट्र आणि देशभरातल्या latest updates