Home /News /maharashtra /

मोठा अपघात टळला, इथोपियन एअरलाइन्सच्या विमानाचं मुंबईत इमरजन्सी लॅडिंग

मोठा अपघात टळला, इथोपियन एअरलाइन्सच्या विमानाचं मुंबईत इमरजन्सी लॅडिंग

वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं तर विमानाचा मोठा अपघात झाला असता.

    मुंबई, 8 नोव्हेंबर: इथोपियन एअरलाइन्सच्या (Ethiopian airlines) मालवाहू विमानाचं (ET690) मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) इमरजन्सी लॅडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. विमानातील हायड्रोलिक सीस्टिम फेल (hydraulic leakage) झाल्यानंतर मुंबई एअरपोर्टवर या विमानाचं इमरजन्सी लॅडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं तर विमानाचा मोठा अपघात झाला असता. हेही वाचा.. टाटा इंडिका कार झाली आऊटऑफ कंट्रोल, झाडावर आदळून 2 जण जागीच ठार मिळालेली माहिती अशी की, रियादहून बंगळुरूला हे विमान जात होत. मात्र, विमानात हायड्रोलिक गळती झाल्याकारणामुळे वैमामनिकाच्या निदर्शनास आलं. त्यानं प्रसंगावधान राखत वैमानिकानं मुंबई एअरपोर्टवर विमानाचं सुरक्षित इमरजन्सी लॅडिंग करण्यात आलं. रन वेवर उतरलेलं विमान पुन्हा हवेत उडालं दरम्यान, युरोपमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्यार चक्रीवादळाने धुमशान घातलं आहे. या वादळामुळं संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता. एवढंच नाही मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता रेल्वे सेवा आणि विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, यातच एका विमानाचा व्हिडिओ समोर आला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं लॅडिंग करतानाची दृश्य टिपण्यात आली आहेत. भयंकर वादळामुळं चक्क हे विमान रन वेवर उतरून पुन्हा हवेत उडालं, हा थरार विमानतळावरील कॅमेरात कैद झाला आहे. मात्र पायलटच्या हुशारीमुळं या विमानाचा अपघात झाला नाही. बर्मिघम एअरपोर्टवर वादळात एक विमान टेक ऑफ करत होतं. मात्र, तेवढ्यात जोरदार वारा सुरू झाला आणि विमान काही वेळासाठी हवेतच तरंगत राहिले. एवढेच नाही तर हवेमुळे या विमानाची दिशा सतत बदलत होती. त्यामुळं जीव मुठीत धरून प्रवासी आत बसलेले असताना पालटनं हुशारी दाखवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तसेच, या पायलटचेही कौतुक केले जात आहे. हेही वाचा..नागपूर: पती पत्नीच चालवायचे ‘सेक्स रॅकेट’, पोलिसांनी पाठवला ‘ग्राहक’ आणि... हे विमान बेलफास्ट या शहरातून येत होतं. मात्र, क्यार वादळामुळे विमानाला बर्मिंघम एअरपोर्टवर लॅन्ड करावं लागलं. त्यानंतर काही वेळात या विमानाने पुन्हा टेक ऑफ केलं. मात्र, वादळाची तीव्रता वाढल्याने विमानाच्या पायलटने हे विमान पुन्हा लँड केलं. पायलटच्या प्रसंगावधानामुळे या विमानातील सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या