कंपनीत वेल्डिंगचे काम करत असताना ठिणगी लागून फटाके कंपनीला लागलेल्या आगीत फटाके कारखाना जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दरम्यान कारखान्यात काम करणारे १० कामगार गंभीर जखमी झाले आहेत तर २० हुन अधिक कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांना कुटीर रुग्णालय डहाणू, खाजगी दवाखाना तसंच वापी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. फटाके कारखान्याला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात आगवण, डेहणे, पळे, आशागड, डहाणू शहर, वाणगाव, देदाळे, साखरे यासह कासा चारोटी परिसरात हादरे बसले. सुरवातीला हे भूकंपाचे धक्के असावेत, असे नागरिकांना वाटले. मात्र आगडोंब उसळू लागल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. रिलायन्स प्रकल्प तसंच बोईसरहुन अग्नीशमक दल पाचारण करण्यात आल्यानंतर दुपारी आग आटोक्यात आली. डहाणू पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.#पालघर मधील डहाणू तालुक्यात फटाका कंपनीच्या बाजूला स्फोट, होऊन लागली आग pic.twitter.com/evxBFel0qy
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Palghar