जळगाव, 07 जुलै : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे (bhosari land scam) वादात सापडलेले राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी ( ED arrests Girish Chaudhary) यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
सत्यजीत रे दिलिप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा
विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव वाढला आहे. भाजपच्या नेत्यांनी भर सभागृहात तुमचा अनिल देशमुख करू अशी धमकीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली होती. अधिवेशन संपत नाही तेच एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन वादाचा अंक पाहण्यास मिळणार आहे.
काय आहे भोसरी जमीन खरेदीप्रकरण ?
-भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद
- ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी
- चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली
- तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी
- पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद
- स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले
- पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं
- रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप
- ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी
- एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED, Eknath khadse, Jalgaon