• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING : गडचिरोली भूकंपाने हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

BREAKING : गडचिरोली भूकंपाने हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आज संध्याकाळी गडचिरोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदु सिरोंचा तालुक्यात जाफ्राबाद आहे.

आज संध्याकाळी गडचिरोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदु सिरोंचा तालुक्यात जाफ्राबाद आहे.

आज संध्याकाळी गडचिरोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदु सिरोंचा तालुक्यात जाफ्राबाद आहे.

  • Share this:
गडचिरोली, 31 ऑक्टोबर :  गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले आहे.  भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. अचानक जाणवलेल्या धक्कांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी गडचिरोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदु सिरोंचा तालुक्यात जाफ्राबाद आहे. या भूकंपाची तीव्रता ही 4.3 इतकी होती. अचानक धक्के जाणवून लागल्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण घरातून बाहेर येऊन मोकळ्या रस्त्यावर येऊन थांबले. सुदैवाने या घटनेत कुठेही कोणताही जीवितहानी झाली नाही. शेवटच्या स्पर्धेतही कॅप्टनने तेच केलं, विराटच्या 10 घोडचुकांनी टीम इंडियाचा घात मागील आठवड्यात 24 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात भूकंपाचे  धक्के जाणवले होते. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाची तीव्रता 4.46 रिश्टर स्केलवर नोंद झाली.  तर साताऱ्यातील कोयना धरण (Koyna Dam) परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती.  सायंकाळी 5 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोयना धरणापासून वारणा खोरे येथे 12 कि.मी. अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदु होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान चार वेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. कोयनेपासून ४१.६ किलोमीटर अंतरावर खेडमधील खोपी, शिरगाव , सवेंनी, मोहाने, अस्तान, आंबवली, बिजघर, तिसंगी , एनवरे, ऐनवली, तळे , यांसारख्या ४७ गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्र बिंदू खेड रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील ईशान्य बाजूस चार किलोमीटर अंतरावर तर चौथा धक्का खेडमधील खोपी गावाच्या नैऋत्य बाजूस तीन किलोमीटर अंतरावर होता. सर्वात मोठा धक्का पहाटे ५ ;२९ वाजता बसला असून या धक्याची तीव्रता ३.८१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती तर इतर तीन धक्के २.६ , २.८, व २.३ एवढ्या रिस्टर स्केलचे होते.
Published by:sachin Salve
First published: