Home /News /maharashtra /

देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा राज्य सरकारचा डाव, भाजप नेता आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा राज्य सरकारचा डाव, भाजप नेता आक्रमक

चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा भाजप नेते राम शिंदे यांचा दावा

अहमदनगर, 17 ऑक्टोबर: राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. थेट जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून झालेल्या तलावाची परिस्थिती दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार हे केवळ भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप करीत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी केली आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. माजी जलसंधारण मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा दावा केला होता. हेही वाचा...एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप करणारा 'तो' इथिकल हॅकर पुन्हा आला चर्चेत भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य भानुदास बेरड यांनी थेट अहमदनगर तालुक्यातील मांडवा येथे जात जलयुक्त शिवार योजनेच्या काम केलेल्या तलावाला भेट दिली. हा तलाव सध्या पूर्णक्षमतेने भरला असून त्यामुळे गावातील लोकांना कसा फायदा होतोय, तलावासमोर उभे राहतच तयार केला, व त्याद्वारे त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम झाले, त्याला आज भेट दिली. यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळप्रवण भागात झालेला पाण्याचा साठा या तलावात दिसतोय. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. या तलावामध्ये साठलेल्या पाण्यामुळे या गावातील जमीनीची भूजल पातळी वाढणार आहे. पर्यायाने विहिरींना पाणी येईल, व या परिसरातील सर्व शेती बारामहिने बागायती होईल, अशा प्रकारचे मोठे काम जलयुक्त शिवारमुळे झाले आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्वतःला काही करता येत नाही, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजनेवर आक्षेप घेण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या जयलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ही चौकशी SIT मार्फत होणार आहे. पाणीपुरवढा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना राज्य सरकारने दिलेला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. ‘कॅग’नेही या योजनेवर ताशेरे ओढले होते त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होणार आहे. हेही वाचा...अभिनेत्री कंगना रणौतविरोधात दाखल होणार FIR, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश 'पाणी अडवा, पाणी जिरवा', ही घोषणा करत दुष्काळमुक्तीसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने ही योजना राबवली होती. त्याचा मोठा गाजावाजाही झाला होता. जलयुक्त शिवार योजनवर 9 हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा नाही असा आरोप होत होता. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली, भूजल पातळी वाढली नाही असाही आरोप त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या