Home /News /maharashtra /

'आवश्यकता होती तेव्हा बोलावलं नाही... याची खंत वाटते, तरीही सरकारला पाठिंबा'

'आवश्यकता होती तेव्हा बोलावलं नाही... याची खंत वाटते, तरीही सरकारला पाठिंबा'

मराठा आंदोलन हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्र शांत कसा राहील, याचं भान ठेवा,

    मुंबई, 16 सप्टेंबर: सरकारी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा बांधवामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. हेही वाचा..शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय, सदाभाऊंनी केली राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितलं की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करण्याची आमची भावना आहे. राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला याची खंत आहे की, आवश्यकता होती तेव्हा बोलावलं नाही, पण आताही आम्ही सरकरला सहकार्य करण्यात तयार आहोत, असं सांगून महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. मराठा आंदोलन हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्र शांत कसा राहील, याचं भान ठेवा, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारचा या निर्णयात कुठलाही सहभाग नाही. केंद्राकडे काही विषय असेल तर मदत करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही कुठलंही कचरे दुवे ठेवले नाहीत. पण मी आता राजकारणावर बोलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आहे, तो धक्कादायक आहेच. पण आता हा खटला तत्काळ घटनापीठाडे जायला हवा, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.  सरकारनं 'सारथी'बाबत लवकर निर्णय घ्यायला हवा. तसेच आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला मदत करायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. घटनापीठाचा मसुदा सादर करणार... राज्य सरकारनं बोलावल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. अध्यादेश काढणे, पूनर्विचार याचिका आणि घटनापीठाकडे दाद मागणे, असे तीन पर्याय ठेवण्यात आले. तिसरा पर्याय अर्थात मराठा आरक्षणाबाबत घटनापीठाकडे दाद मागणे हा यावर एकमत झालं आहे. सोमवार, मंगळवारपर्यंत सरकार घटनापीठाचा मसुदा सादर करणार असे आश्वासन सरकारनं दिलं आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे इतर मंत्रीही उपस्थित होते. तर अशोक चव्हाण हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभागी झाले. हेही वाचा...मराठा आंदोलकांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा.. छत्रपती संभाजीराजेंचा इशारा विशेष म्हणजे, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे. ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती दिली. तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Devendra Fadnavis

    पुढील बातम्या