मुंबई, 30 सप्टेंबर: कोरोना विरोधात संपूर्ण देश योध्याप्रमाणे लढत असताना काही असामाजिक तत्व मात्र याचा गैरफायदा घेऊन आपलं उखळ पांढरं करून घेताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारात फायदेशीर ठरणारं टोसिलीझुंब कंपनीचं 'आस्टेम्बरा' या सारखं बनावट इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने बनावट इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीहून एकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यानंतर डॉक्टर हेच इंजेक्शन देत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..बिलं भरणारी अॅप सुरक्षित आहेत का? ऑनलाइन पेमेंट करताना घ्या ही काळजी
कोरोना रुग्णासाठी अत्यावश्यक असणारं टोसिलीझुंब आस्टेम्बरा इंजेक्शनचा काळाबाजार सुरू होता. टोकसिलीझुंब आस्टेम्बरा 400 mg हे इंजेक्शन 50 ते 60 हजार रुपये इतक्या चढ्या दरानं बाजारात विकलं जात होतं. याबाबत
बातम्या आल्यावर राज्य सरकार जागं झालं आहे. अन्न व औषध पुरवठा आणि पोलिसांनी याप्रकरणी संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
मिळालेली माहितीनुसार, मुंबईतल्या मोहम्मद अली रोड येथे टोकसिलीझुंब इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त दराने आझम नासिर खान हा विकत होता. त्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्या चौकशीत दिल्ली येथूनच या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांचं एक पथक तयार करून पुढील चौकशी सुरू आहे.
बनावट इंजेक्शन बाजारात...
टोकसिलीझुंब कंपनीचं आस्टेम्बरा 400 mg बनावट इंजेक्शन बाजारात आणून विकल्या जात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 च्या पथकाने तपास करून दिल्ली हुन एका आरोपीला अटक केली आहे.
अजय श्यामलाल नासा (वय 40 वर्षे) असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 15 बनावट इंजेक्शन जप्त केले आहेत. हे इंजेक्शन सुद्धा मूळ किमतीच्या 2 ते 3 पट इतक्या जास्त दराने विकले जात होते. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष 9 चे पोलोस अधिकारी नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने दिल्लीत जाऊन केली.
हेही वाचा..ड्रग्ज रॅकेटबाबत मोठा खुलासा; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच मास्टरमाइंड
अजय शामलाल नासा यानं गुडगाव (उत्तर प्रदेश) येथून एका मेडिकलमधून 58 हजार रुपयाला एक इंजेक्शन विकत घेतलं आणि त्याचे बनावट इंजेक्शन तयार करून विकण्यास सुरुवात केली. यासाठी त्यानं इंजेक्शनचे कव्हर आणि बॉटल उत्तरांचल येथून हुबेहूब बनवून घेतले. त्यात डेक्सोना व डेरीफेलिन हे अस्थमासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन आणि डिस्टील वॉटर टाकून प्रत्येकी 20 एमएलच्या बॉटलमध्ये टाकून तयार करणार होता. आरोपीनं जवळपास 3 हजार बॉटलची ऑर्डर दिली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. आरोपीनं मुंबईसह इतर ठिकाणी बनावट इंजेक्शन विकले आहेत काय? याबाबत पोलिस शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona