• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुंबईत सप्टेंबरमध्ये सातत्यानं वाढतोय कोरोनाचा आलेख, महापालिकेनं व्यक्त केली भीती

मुंबईत सप्टेंबरमध्ये सातत्यानं वाढतोय कोरोनाचा आलेख, महापालिकेनं व्यक्त केली भीती

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे.

  • Share this:
मुंबई, 19 सप्टेंबर: कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर राज्यात 3 लाखांच्या जवळ Active रुग्ण आहेत. त्या मुंबईत गेल्या 15 दिवसांत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पंचवीस हजारानं वाढली आहे. ही वाढ आत्तापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख सारखा वर सरकत आहे. रुग्ण संख्येत होणारी ही वाढ आणखी महिनाभर सुरू राहील, अशी भीती पालिकेनं व्यक्त केली आहे. हेही वाचा..PM मोदींनी कोरोनावर बोलावली बैठक, उद्धव ठाकरेंसह 7 राज्यांचे CM उपस्थित राहणार मुंबईत मे महिन्यातही रुग्ण संख्या दररोज 1500 नव्या रुग्णांच्या वर गेली नव्हती. मात्र, ती आता दररोज 2000 पार होऊ लागली आहे. ऑगस्टमध्ये रुग्णवाढीचा आलेख खाली आला होता. मात्र, हाच आलेख सप्टेंबर महिन्यात वर सरकाला आहे. अचानक रुग्णसंख्या वाढीनं वेग घेतला आहे. त्यातही पश्चिम उपनगरात रुग्णसंख्या जास्त वाढत आहे. दरम्यान, मुंबईत अनलॉकमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यात ही मुंबईचा पश्चिम भाग हा जास्त रुग्ण संख्या असलेला भाग आहे. कारण या भागात बाजार, औद्योगिक संस्थी, कार्यालये जास्त आहे. लॉकडाऊननमध्ये हा भागात कडकडीत बंद होता. मात्र, अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यानंतर लोक हळूहळू घराबाहेर पडू लागले. एकमेकांच्या संपर्कात आल्यानं इन्फेक्शन पसरत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. अनलॉक करताना अशी वाढ दिसून येईल, याची आम्हाला कल्पना होती. त्यादृष्टीनं आम्ही तयारी करून ठेवली होती, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागात गेल्या 15 दिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. येथे रुग्ण संख्या वाढीचा दर हा साधारणपणे 1 टक्क्यापेक्षा जास्त आहे. मुंबईतली कोरोनाबधितांची संख्या आतापर्यंत 1 लाख 80 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत 8372 जणाचा बळी घेतला आहे. त्यात गेल्या काही दिवसांत झालेली वाढ मुंबईकरांची झोप उडवणारी आहे. तरी यापूर्वी मुंबईने ज्या धीराने कोरोनाचा सामना केला, तसाच पुन्हा एकदा करावा, अशी खात्री मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा...भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कुटुंबातील सदस्यही पॉझिटिव्ह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या महापालिकेला अपेक्षित असलेल्या वाढीपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. आमच्या रुग्णालयात पुरेशे आयसीयू बेड, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. रुग्ण संख्येत होणारी ही वाढ आणखी महिनाभर सुरू राहील, अशी भीती पालिकेनं व्यक्त केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: