मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का?

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का?

अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

मुंबई, 15 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राज्यपाल यांनी ही महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा...राज्यपालांना भेटले मदन शर्मा, म्हणाले, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस (RSS) शाखा किंवा भाजप (BJP) कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशी कडवट टीका काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली.

दरम्यान, आमदार भाई जगताप यांनी कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.

हक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रणौतनं केलेली गद्दारी आहे. याचा उल्लेख करावासा वाटेल. 2016 मध्ये कंगना रणौतच्या बाबतीत अध्ययन सुमन याला कोकेन घेण्यास सांगत होती, असं त्यानंच सांगितलं होतं. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असं भाई जगताप यांना सभागृहात सांगितलं होतं.

भाई जगताप यांच्या ट्वीटमुळे पडली वादाची ठिणगी...

अभिनेत्री कंगना रणौत प्रकरण सध्या राज्यात चांगलंच तापलं हे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून आक्रमक झालेल्या कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद कंगनाविरुद्ध शिवसेना असा झाला. यात कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेनं पाडल्यानंतर कंगनानं संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाला समज दिली होते.

कंगनाच्या कार्यालयाचा बेकादया बांधलेला भाग महापालिकेनं गेल्या आठवड्यात पाडला. यावरून संतापलेल्या कंगनानं या कारवाईचा फोटो शेअर करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली होती. कंगनाच्या या ट्वीटला काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी उत्तर दिलं.

हेही वाचा...धक्कादायक! माथेफिरू प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीवरच झाडली गोळी, अन्...

मुंबई बृह्नमहापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत काम पाडलं. यावरून कंगनानं संतापही व्यक्त केला होता. महापालिकेच्या कारवाईविरोधात कंगनानं हाय कोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टानं कारवाईला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेनं कारवाई थांबवली होती. मात्र, यावरून चर्चा पेटली आहे.

First published:

Tags: Kangana ranaut