Home /News /maharashtra /

शिवसेनेला आणखी एक धक्का! महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडणार

शिवसेनेला आणखी एक धक्का! महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडणार

सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे.

    मुंबई, 10 सप्टेंबर: सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. सभागृहाची बैठक तातडीनं बोलवावी असून यासाठी भाजपचं महापौरांना पत्र लिहिलं आहे. मुंबईत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. या भ्रष्टाचारावरुन भाजप महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. हेही वाचा...मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. दुसरीकडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या (Kangana Ranaut) वांद्रेतील पाली हिल मार्गावर असलेल्या बंगल्याचे बेकायदेशीर बांधकाम बुधवारी पाडलं. मुंबई हायकोर्टाच्या स्थगितीआधीच बीएमसीनं कंगनाच्या घराचं अतिक्रमण पाडलं. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं 'मणिकर्णिका' फिल्म्स कार्यालयाचे बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर, जेसीबी व हातोड्याचा वापर केला. या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने कारवाईला स्थगिती दिली खरी, परंतु तोवर बरेच बांधकाम पाडण्यात आले होते. हेही वाचा... कंगनाच्या कुठल्याही टीकेला शिवसेना देणार नाही उत्तर, नेत्यांना महत्त्वाचा आदेश सूडबुद्धीनं कारवाई : भाजप भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर सुडाचे राजकारण केल्याचा आरोप केला. मातोश्रीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई का केली नाही, असे ते म्हणाले. तर शरद पवार यांनी या प्रकरणात विनाकारण प्रसिद्धी दिली जात असल्याचे सांगून कंगनाच्या विधानांना गरज नसताना महत्त्व दिले जात असल्याची टीका केली. दुसरीकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी हिमाचल प्रदेशातून फोनवर दोन वेळा धमक्या आल्या आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BMC, Shiv sena

    पुढील बातम्या