Home /News /maharashtra /

दिशाच्या 'लिव्ह इन पार्टनर'चा जबाब महत्त्वाचा, नितेश राणेंच अमित शहांना पत्र

दिशाच्या 'लिव्ह इन पार्टनर'चा जबाब महत्त्वाचा, नितेश राणेंच अमित शहांना पत्र

दिशाचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय हा जीवाच्या भीतीपोटी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे.

मुंबई, 16 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Bollywood Actor Sushant Singh Rajput) यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI)करत आहे. पुढील आठवड्यात सुशांतची व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दावा केला आहे. दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे. हेही वाचा...सुप्रिया सुळे पुन्हा आक्रमक, संसदेत 'या' मुद्द्यावरून मोदी सरकारला धरलं धारेवर दिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूसाठी महत्त्वाचा आहे, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा जीवाच्या भीतीपोटी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचं नितेश राणे यांनी अमित शहा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागणी केली होती. सीबीआयने दिशाचा लिव्ह इन पार्टनर रोहन राय याची चौकशी करायला हवी. या चौकशीतून मोठी माहिती मिळेल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. सीबीआय, एनसीबी आणि ईडीच्या चौकशीवर नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हेही वाचा...धक्कादायक! मुंबईत कोविड सेंटरमध्ये घडलं आणखी एक घृणास्पद कृत्य... 8 जून रोजी दिशा सालियान हिनं आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जूनला सुशांतनं देखील आत्महत्या केली. त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 8 जूनला दिशा ज्या पार्टीत होती, तिथे तिच्यासोबत काही चुकीचं झालं होतं. ती तिथून निघाली होती. त्यावेळी तिनं सुशांतला फोनही केला होता. यावेळी दिशासोबत रोहन रॉय हा होता. दिशा इमारतीवरून पडली तेव्हा रोहन रॉय यानं तातडीनं खाली येणं अपेक्षीत होतं. मात्र, तसं झालं नाही. रोहन रॉय हा तब्बल 25 मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉयची सीबीआय चौकशी होणे गरजेचं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Amit Shah, Nitesh rane

पुढील बातम्या