भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कुटुंबातील सदस्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण, कुटुंबातील सदस्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह

कौटुंबिक सहकाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही चाचणी करून घेतली.

  • Share this:

चंद्रपूर, 19 सप्टेंबर: देशात महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कौटुंबिक सहकाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही चाचणी करून घेतली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा...नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

मिळालेली माहिती अशी की, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी करून मुनगंटीवार यांनी अन्य चाचण्या देखील करून घेतल्या आहेत. मुनगंटीवार घरीच उपचार घेणार आहेत. तसेच त्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील केली कोरोना चाचणी केली जाणार आहे.

बच्चू कडूसह संपूर्ण कोरोना पॉझिटिव्ह...

दुसरीकडे, विदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळून आलं आहे. याबाबत त्यांनी स्वत:च 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना माहिती दिली आहे.

बच्चू कडू हे 'न्यूज18 लोकमत'वरील एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात आपलं मत मांडत असतानाच बच्चू कडू यांचा कोरोना चाचणीबाबतचा अहवाल आला. त्यानंतर त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीही बच्चू कडू हे आजारी होते. कोरोनासदृश्य लक्षणं असल्याने त्यावेळीही त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र आता अखेर बच्चू कडू यांना कोरोनाने गाठलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना फिल्डवर सक्रीय असेलेल्या इतर घटकांप्रमाणेच लोकप्रतिनिधीही या व्हायरसची लागण होण्यापासून स्वत:ला वाचवू शकले नाहीत. याआधीही राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झालेली होती. मात्र सुदैवाने ते सर्वजण कोरोनाला हरवून पुन्हा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त...

राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.

हेही वाचा...'सनातनचं निर्दोषत्व सिद्ध! भगवा दहशतवादाचं मिथक प्रचारित करणार्‍यांना चपराक'

राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर राज्यात 3 लाखांच्या जवळ Active रुग्ण आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 8:55 PM IST

ताज्या बातम्या