मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING NEWS: काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल? नाना पटोलेंना तातडीने दिल्लीला बोलावले

BREAKING NEWS: काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल? नाना पटोलेंना तातडीने दिल्लीला बोलावले

विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.

विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.

विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.

धुळे, 24 जून: पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला (Delhi) रवाना होणार आहे.

नवी दिल्लीत काँग्रेसची शुक्रवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले 3 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. त्यामुळे  धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धात सोडून आज सायंकाळी नाना पटोले मुंबईला जाणार आहे. आज संध्याकाळीच मुंबईहून पुढे दिल्लीला रवाना होणार आहे. पावसाळी अधिवेशन येऊ घातले असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.

WTC Final : न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू झाले भावुक, विजेतेपदावर दिली 'ही' प्रतिक्र

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या  दिल्लीतच आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते कमलनाथ   आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शुक्रवारी काँग्रेसची बैठक होत आहे, दिल्लीतील हालचालीनंतर पटोले यांना तात्कालिक दिल्लीत येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद देण्यात यावे, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

फक्त सेंटर उरलं, चोरांनी चक्क ATM मशीनच पळवलं, 17 लाखांची रोकड गायब

जर, विधानसभा अध्यक्षपद नितीन राऊत यांना दिले तर त्यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हे नाना पटोले यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांनी टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Congress, Nana Patole, Nitin raut, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष