Home /News /maharashtra /

मोठी बातमी, पुण्यात पुढील 3 दिवस 40 हजार दुकाने बंद राहणार!

मोठी बातमी, पुण्यात पुढील 3 दिवस 40 हजार दुकाने बंद राहणार!

पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    पुणे, 16 मार्च : पुण्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या कालावधीत पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये सोने, चांदी,कपडे अशा दुकानांचा समावेश असणार आहे. पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुण्यात काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अफवांचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसपेक्षा अफवांमुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातून नागरिकांच्या हातून कायद्यांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कुणालाही पॅनिक करू नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. हेही वाचा- पुणेकरांनो घाबरून जाऊ नका...फक्त प्रशासनाने सांगितलेल्या या 21 गोष्टी नीट लक्षात ठेवा! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही, अशी महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या