मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : गडचिरोलीमध्ये चकमकीत 26 माओवादी ठार, वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई

BREAKING : गडचिरोलीमध्ये चकमकीत 26 माओवादी ठार, वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती.

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती.

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती.

गडचिरोली, 13 नोव्हेंबर : गडचिरोलीमध्ये (gadchiroli) आज  पोलीस आणि माओवाद्यांमध्ये (Maoists ) चकमक उडाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये 26 माओवाद्यांचा खात्मा  (26 Maoists killed ) करण्यात जवानांना यश आले आहे. वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीत आज सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. धानोरा तालुक्यात मुरुम गावाजवळील जंगलामध्ये माओवादी मोठ्या प्रमाणात लपून बसले होते. पोलीस गस्तीवर आले असल्याचा याची माहिती मिळाली. हे सर्व माओवादी छत्तीसगडमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली.

भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असताना सळईचा सांगाडा कोसळला, 8 जण जखमी

या चकमकीत पोलीस जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत  26 माओवाद्यांना ठार झाले आहे. सकाळपासून झालेल्या कारवाईत मृतक माओवाद्यांची संख्या 26 झाल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

UPSC : केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. सकाळी पाच मृतदेह सापडले होते. अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असल्याने सॅटेलाईट फोनवरुन पोलीस मुख्यालय संपर्क करत आहे. मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 2018 मध्ये 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

First published: