• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE चर्चेतच राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले 'मी कोरोना पॉझिटिव्ह', पाहा VIDEO

LIVE चर्चेतच राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले 'मी कोरोना पॉझिटिव्ह', पाहा VIDEO

बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळून आलं आहे. याबाबत त्यांनी स्वत:च 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना माहिती दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्राभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालली आहे. अशातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित आढळून आलं आहे. याबाबत त्यांनी स्वत:च 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना माहिती दिली आहे. बच्चू कडू हे 'न्यूज18 लोकमत'वरील एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात आपलं मत मांडत असतानाच बच्चू कडू यांचा कोरोना चाचणीबाबतचा अहवाल आला. त्यानंतर त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीही बच्चू कडू हे आजारी होते. कोरोनासदृश्य लक्षणं असल्याने त्यावेळीही त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र आता अखेर बच्चू कडू यांना कोरोनाने गाठलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना फिल्डवर सक्रीय असेलेल्या इतर घटकांप्रमाणेच लोकप्रतिनिधीही या व्हायरसची लागण होण्यापासून स्वत:ला वाचवू शकले नाहीत. याआधीही राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झालेली होती. मात्र सुदैवाने ते सर्वजण कोरोनाला हरवून पुन्हा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत.
  Published by:Akshay Shitole
  First published: