मुंबई, 5 ऑगस्ट: मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा...'राम मंदिर शिलान्यासचं श्रेय साधु-संतांना, बाबरी मशिदीचा खटला आता ठरणार निरर्थक'
पुढील तीन तासात मुसळधार अति मुसळधार पाऊस पडेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे 26 जुलैची आठवण करून देणारी स्थिती निर्माण होते की अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोलाबा वेधशाळेनं दिलेली माहिती अशी की, गेल्या 9 तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.
दुसरीकडे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून मुंबईकरांना वादळी वारासह पावसात खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
5th Aug Colaba Observatory recorded 229.6 mm rainfall in last 9 hrs. Intense rains going on. So it will be interesting to see the total rainfall figure (24 hrs) tomorrow morning at 8.30 am Following table is rainfall recorded at Colaba in 24 hrs earlier pic.twitter.com/ajZPP1bK6C
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2020
पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.
घराबाहेर न पडण्याचं आवाहन...
मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केलं आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पेलिसांशी 100 या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रस्ते गेली पाण्याखाली तर अनेक वृक्ष भुईसपाट
दुसरीकडे, दक्षिण मुंबईत वादळ वारा व जोरदार पाऊसमुळे काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, महात्मा फुले मंडई, वूड हाऊस मार्ग कुलाबा, बॅकाबे आगार समोर या भागात वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain