मुंबई, 07 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्यानेही पुढील रात्री 11.30 वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा ( weather alert) दिला आहे. राज्यात महापूर आणि माती वाहून जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. (Heavy rains in the maharashtra)
मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पुढील काही तास हे महाराष्ट्रासाठी चिंतातूर असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठिकाणी नद्यांना महापूर येण्याची भीती वर्तवली जात आहे. तसंच, काही ठिकाणी माती वाहून जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नाशिक, सातारा, कोल्हापूर, कोकण, उस्मानाबाद जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रात्री 11.30 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, नदी आणि तलाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.