Home /News /maharashtra /

BREAKING: तरुणांनी मासे पकडण्यासाठी टाकले जाळे, हाती लागले ग्रेनाईड बॉम्ब, सातारा हादरलं

BREAKING: तरुणांनी मासे पकडण्यासाठी टाकले जाळे, हाती लागले ग्रेनाईड बॉम्ब, सातारा हादरलं

साताऱ्यात कराड तालुक्यातील तांबवे गावच्या हद्दीतील कोयना नदीपात्रात ग्रॅनाईट बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे

सातारा, 17 मे: तौक्ते चक्रीवादळाच्या संकटातून महाराष्ट्र अजून सावरला नाही तेच साताऱ्यात (Satara) धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यात कराड तालुक्यातील तांबवे गावच्या हद्दीतील कोयना नदीपात्रात ग्रॅनाईड बॉम्ब (Grenade bomb) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून निघाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराडमधील तांबवे गावातील काही तरुण दुपारच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी कोयना नदीच्या पुलावर गेले होते. मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकताच जाळ्यात हे बॉम्ब सापडले आहेत.सुरुवातीला काही जड वस्तु लागली या उत्सुक्तेनं तरुणाने जाळे आपल्याकडे ओढले, जेव्हा जाळ्यात जड वस्तू बाँम्ब असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन खचली. या युवकांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिला. पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक घटनांसाठी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. नदी पात्रात सापडलेले तीन बॉम्ब कोणी टाकले याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या