Home /News /maharashtra /

BREAKING : नाथाभाऊंना धक्का, पत्नी मंदा खडसे यांनाही चौकशीसाठी ईडीने बोलावले?

BREAKING : नाथाभाऊंना धक्का, पत्नी मंदा खडसे यांनाही चौकशीसाठी ईडीने बोलावले?

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी मंदा खडसे यांना ईडीकडून चौकशीसाठी यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 24 जुलै : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Bhosari Land Case) राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या मागे लागलेली ईडीची (ed) ससेमिरा अजूनही कायम आहे.  आता एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे (manda khadse) यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विश्वनिय सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी मंदा खडसे यांना ईडीकडून चौकशीसाठी यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, मंगळवार दिनांक 27 जुलै रोजी मंदा खडसे यांना चौकशीसाठी ईडीच्या पथकाने ई डी कार्यालयात बोलावले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. Most Handsome Asian Man: आशियातील सर्वात हँडसम पुरुष ठरला Prabhas त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी मंदा खडसे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  भोसरी भूखंड प्रकरणी यापूर्वी ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. तर एकनाथ खडसे यांची देखील या प्रकरणात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीना चौकशीला बोलावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली असल्याची आधी माहिती समोर येत होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यावर या चौकशी समितीचा अहवालच गहाळ झाला असं वृत्त मंगळवारी समोर आलं. एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा अहवाल गहाळ झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता हा अहवाल सापडला असल्याचं बोललं जात आहे. न्यायासाठी लढणाऱ्यांसोबत धोका; पदवी नसतानाही वकिली करणाऱ्या महिलेचं फुटलं बिंग पण १४ जुलै रोजी भोसरी जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन राज्य सरकारने झोटिंग समिती नेमली होती आणि त्याचा एक खळबळजनक अहवाल समोर आल्याची माहिती समोर आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या झोटिंग समितीत एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती. एकनाथ खडसेंनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असंही समितीचा अहवाल सांगत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या