नवी मुंबई, 25 सप्टेंबर: राज्यात कोरोना व्हायरस (Corona Virus) थोड्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोकाही सांगण्यात आला आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी राज्य सरकारसह पालिकेनं नियमावली आखली आहे. मात्र अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. अशातच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बारवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) बारवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने (NMCC) कोविड -19 मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन बारवर कारवाई करत प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
जो बायडेन यांचं भारत कनेक्शन, बैठकीत सांगताच हसू आले पंतप्रधान मोदींना
NMCCचे प्रवक्ते महेंद्र कोंडे यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, गुरुवारी महापालिकेच्या दक्षता पथकाला हे तिन्ही बार आणि रेस्टॉरंट्स मर्यादीत वेळेनंतरही सुरु असल्याचं आढळून आलं. त्यानंतर या बारवर कारवाई करण्यात आली आहे. पुढे कोंडे म्हणाले की, कारवाई करण्यात आलेल्या बारमध्ये दोन बार सीबीडी बेलापूरमधील आहे तर तिसरा कोपरखैरणेमध्ये आहे.
IPL 2021, RCB vs CSK: धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे मिळाली कोहलीची विकेट, 'त्या' सल्ल्यानंतर बदललं मॅचचं चित्र
NMCC आयुक्त अभिजित बांगर यांनी इशारा दिला आहे की, जर यानंतरही या बार मालकांनी पुन्हा मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं तर ते एक आठवड्यासाठी बंद केले जातील किंवा तिसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना व्हायरसशी संबंधित लॉकडाऊन असेपर्यंत ते बंद ठेवण्यात येतील.
आठवड्याच्या सुरुवातीला पनवेलमधल्या बारवर कारवाईचा बडगा
21 सप्टेंबरला तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या बार मालकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली. कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत लपूनछपून बार सुरू करणाऱ्या तळोजा, पनवेलमधील दोन बारवर पोलिसांनी ही कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.