BREAKING : पुण्यात 'कोरोना'चा धोका वाढला, आणखी 1 रुग्ण आढळला

BREAKING : पुण्यात 'कोरोना'चा धोका वाढला, आणखी 1 रुग्ण आढळला

गेल्या 24 तासामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. पिंपरी चिंचवडमधील हा रुग्ण आहे.

  • Share this:

पुणे, 17 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. पुण्यात गेल्या 24 तासामध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतही आणखी एक रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे.

'कोरोना' व्हायरसबाबत  विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर आणि  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

गेल्या 24 तासामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.  पिंपरी चिंचवडमधील हा रुग्ण आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 17 रुग्णांची संख्या झाली आहे, अशी माहिती म्हैसकर यांनी दिली. तसंच,  26 हजार घरं तपासण्यात आली आहे. तर  7 हजार जणांची चाचणी घेण्यात आली आहे.  आज 17 लोकं स्वत:हून तपासणीसाठी आले होते.  त्यांच्यापैकी 15 सॅम्पल निगेटिव्ह आले असून  2 पेंडिग आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना 24 तासांचं  होम क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे. नंतरच तपासणी करून घरी सोडलं जाणार आहे. यासाठी बालेवाडीतही क्वारंटाइन सेंटर उभारणार आहे, जर विलगीकरण कालावधीत विलगीकरण कक्षाच्या बाहेर पडल्यास कारवाई करण्यात येईल.  क्वारंटाइन संशयितांकडून यापुढे लेखी अंडरटेकिंग घेणार आहे, असंही म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.

आजपासून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व शासकीय कार्यालये बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर,  बीएस 4 गाड्यांचं पासिंग 31 मार्चपर्यंत करणं बंधनकारक आहे. त्यामुळे नवीन वाहनांच्या नोंदणी करता कोणीही प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊ नये. शहरातली गर्दी टाळण्यासाठी आरटीओचं पासिंग ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहे, असंही जाहीर करण्यात आलं आहे.

पीएमपीच्या फेऱ्या 1700 वरून 1100 पर्यंत कमी केल्या आहे. गरज पडल्यास पीएमपी बस फेऱ्याही रद्द करण्यात येईल. फक्त ज्या भागात विद्यार्थी आहे, त्या परिसरातील बससेवा सुरू राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत आणखी एक रुग्ण वाढला

तर दुसरीकडे  कोरोनाचा मुंबईतही एक रुग्ण आढळून आला. मुंबई इथं  एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. अमेरिकेतून आलेल्या या प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यात एकूण 40 रुग्ण झाले आहे. तर आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पण पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं.नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे.

First published: March 17, 2020, 5:52 PM IST

ताज्या बातम्या