• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING : अनिल देशमुखांच्या खास माणसाला CBI ने केली ठाण्यात अटक, दरवाजा तोडून घेतलं ताब्यात

BREAKING : अनिल देशमुखांच्या खास माणसाला CBI ने केली ठाण्यात अटक, दरवाजा तोडून घेतलं ताब्यात

ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

  • Share this:
ठाणे, 31 ऑक्टोबर : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी आता ठाण्यात (thane) कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातून सीबीआयने (cbi) एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती अनिल देशमुख यांच्या जवळचा माणूस असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी वसुली प्रकरणाची लिंक आता ठाण्यात पोहोचली  आहे. ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.  ठाण्यातील वसंत विहार इमारतीतून जगतापला अटक करण्यात आली आहे. २२ व्या मजल्यावर जगताप राहत होता. दरवाजा उघडत नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून अटक केली. ही संपूर्ण कारवाई शनिवारी मध्यरात्री झाली. त्याच्याकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. टाटाच्या 'या' कंपनीत 10 हजारहून अधिक जणांना नोकरीची संधी शंकर जगताप हा अनिल देशमुख यांच्या खास व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने जगतापला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले.  न्यायालयाने त्याची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.  ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुखांची याचिका फेटाळली दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED ईडीने बजावलेली समन्स रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) रद्द केली आहे. त्यामुळे देशमुखांवर कारवाईची शक्यता वाढली आहे. बीडमध्ये चक्क 124 गाढवांची चोरी, किंमत ऐकूण पोलीसही चक्रावले गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे बेपत्ता आहे. त्यांच्याविरोधात ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही. त्यातच त्यांनी ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laundering) सुरक्षेची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण (plea seeking protection) मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अर्ज केला होता. पण, कोर्टाने याचिका फेटाळून लावली.
Published by:sachin Salve
First published: