BREAKING रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळली, 60 पेक्षा अधिक फ्लॅट असल्याने जीवितहानीचा मोठा धोका

BREAKING रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळली, 60 पेक्षा अधिक फ्लॅट असल्याने जीवितहानीचा मोठा धोका

अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे.

  • Share this:

रायगड, 24 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून (Mahad Building Collapsed) मोठी दुर्घटना घडली आहे. कारण या इमारतीमध्ये 60 पेक्षा अधिक फ्लॅट होते, अशी माहिती आहे. तसंच काही कुटुंब यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे.

महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती. अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत मृत किंवा जखमी व्यक्तींचा नेमका आकडा समोर आलेला नाही.

एनडीआरएफच्या दोन टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्या असून आणखी एक टीम पाठवण्यात येत आहे.

काही तासांपासून हलत होती इमारत

महाडमध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीचे युनुस शेख व पटेल हे ठेकदार होते. या इमारतीत एकूण 40 कुटुंब राहात होते. त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज घ्यावी लागणार आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह स्थानिकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचं निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडली होती.

दरम्यान, मागच्या काही वर्षात या भागात सिंगल लोड बेअरिंग इमारतींचं प्रमाण वाढलं आहे. हा प्रकार जीवघेणं आहे आणि प्रशासन पण याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 24, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या