मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : परमबीर सिंगांना कोर्टाचा दिलासा, या प्रकरणात अटक वॉरंट रद्द

BREAKING : परमबीर सिंगांना कोर्टाचा दिलासा, या प्रकरणात अटक वॉरंट रद्द

परमबीर सिंग यांनी आज ठाण्यात ठाणेनगर पोलीस स्टेशनला हजेरी लावली होती. बुकी सोनू जालनने मोक्का न लावण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला होता

ठाणे, 26 नोव्हेंबर : 100 कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून फरार झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh)अखेर प्रकट झाले आहे. बुकी सोनू जालनने ( bookie Sonu Jalan case) केलेल्या आरोप प्रकरणी परमबीर सिंग यांना कोर्टाने दिलासा दिला असून अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांनी आज ठाण्यात ठाणेनगर पोलीस स्टेशनला हजेरी लावली होती. बुकी सोनू जालनने मोक्का न लावण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला होता. तसंच विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर कोर्टात हजर झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी कोर्ट आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं सांगितलं. कोर्टाने या प्रकरणी  15 हजार रुपयांचा जात मुचलक्यावर अदखलपात्र वॉरंट रद्द केला आहे. त्यामुळे सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाबर आझमसह पाकिस्तान संघावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

दरम्यान, परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर  गुन्हे शाखेच्या (Crime Branch) कार्यालयात पोहोचले. यावेळी परमबीर सिंग यांची 6 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत

आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हेगारीचा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. बिल्डर सह बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं त्यांना फरार घोषित केलं होतं. आता हे वॉरंट रद्द करण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

परमबीर यांच्यावर 5 गुन्हे दाखल

राज्य सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात लूक आउट परिपत्रक जारी केलं आहे. सिंह यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक मुंबई, एक ठाण्यात आणि तीन प्रकरणांचा तपास राज्य सीएआय करत आहे. परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारच्या गृह विभागाने 7 सदस्यीय एसआयटी टीमची स्थापना केलीय. या टीमचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करत आहेत.

First published: