BREAKING : बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन!

BREAKING : बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन!

उद्यापासून 3 दिवस दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्वच दुकानं बंद राहणार आहे.

  • Share this:

 

बीड, 04 मे : कोरोनाबाधित (maharashtra corona case)रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सांगली, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) कडक लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. आता बीड (Beed Lockdown)जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून  सूचना देत आहेत तर पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.

कोरोनाकाळात घरबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 50 हजार कमाई

सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवेचे दुकानं खुली ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, उद्यापासून 3 दिवस दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्वच दुकानं बंद राहणार असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

बीड शहरात वेळ संपल्यानंतर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं होतं. यावेळी भाजी मंडई, कारंजा, बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याबरोबरच जिल्हा रुग्णालय बाहेरील सुरु असलेली दुकानं यावेळी पोलिसांनी बंद पडली आहेत.

नव्या नवरीला घेऊन घरी परतले अन् चोराने तोपर्यंत लाखो रुपये पळवले!

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जाते. बीड आणि अंबाजोगाईत पंधरा केंद्राच्या माध्यमातून जागेवरच अँटीजेन टेस्ट आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जात आहे.

दरम्यान, यावेळी कपड्याच्या दुकानाबरोबरच इतर दुकान बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दुकान खुली होती, आणि याच दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी

25 एप्रिल 1237

26 एप्रिल1086

27 एप्रिल1297

28 एप्रिल 1346

29 एप्रिल 1467

30 एप्रिल 1537

1 मे  1512

2 मे 1345

3 मे 1256

जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण 9000 आहे तर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित 58124 रुग्ण संख्या आहे. तर

आतापर्यंत 890 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 3:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या