उल्हासनगर, 30 सप्टेंबर : पाचशे रुपयांच्या वादातून वाईन शॉप चालकाला कात्रीने भोसकल्याची घटना उल्हासनगर जवळच्या म्हारळ गावात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
म्हारळ गावाच्या हद्दीत मुरबाड रोडवर रोझ वाईन शॉप आहे. या वाईन शॉपमध्ये सोमवारी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान एक अज्ञात इसम दारू विकत घेण्यासाठी आला. यावेळी त्याने आपण पाचशे रुपये दिल्याचा दावा केला, तर दुकानदाराने मात्र पैसे घेतले नसल्याचा दावा केला. यावरून या दोघांमध्ये वाद झाला.
उल्हासनगर-५०० रुपयांच्या वादातून वाईन शॉप चालकाला कात्रीने भोसकलं pic.twitter.com/EQstIpZQXx
— News18Lokmat (@News18lokmat) September 30, 2020
या वादातून या अज्ञात इसमाने त्याच्याकडील कात्री आणि हातोडीच्या सहाय्याने वाईन शॉप चालकावर हल्ला चढवला. या इसमाने दुकानात घुसून दुकानातील दोन जणांवर त्याने कात्रीने हल्ला केला. इतकंच नव्हे तर हल्ला केल्यानंतर तिथेच उभं राहून हल्लेखोर दारूही प्यायला.
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या साक्षीची आत्महत्या
हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. या हल्ल्यात वाईन शॉपमधील दोघांना गंभीर इजा झाली असून टिटवाळा पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.