विधानसभा लढवण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रकांत पाटलांना धक्का, ब्राह्मण महासंघाचा विरोध

चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 01:12 PM IST

विधानसभा लढवण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रकांत पाटलांना धक्का, ब्राह्मण महासंघाचा विरोध

पुणे, 30 सप्टेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा सुरू होताच चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे.

'पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपच्या बरोबर राहिला आहे. असं असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार,' असं म्हणत आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका केली आहे.

'जातीचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारसुद्धा उभे करू,' अशी आक्रमक भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्याआधीच चंद्रकांत पाटील अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बंडखोरी करणार

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असतील तर शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे निवडणूक लढविणार आहेत. याबाबत स्वत: मोकाटे यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यास शिवसेना बंडखोरी करणार असून, हे निश्चीत झाले आहे. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला असून, मुरलीधर मोहोळ यांचीही संधी हुकली आहे.

Loading...

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...