लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटणं बेतलं जीवावर, गावकऱ्यांकडून तरुणाची गळा चिरुन हत्या

लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटणं बेतलं जीवावर, गावकऱ्यांकडून तरुणाची गळा चिरुन हत्या

या तरुणाचा मृतदेह शेतातील एका खड्ड्यात अत्यंत वाईत परिस्थितीत आढळून आला

  • Share this:

रांची, 27 मार्च :  कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावावर देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. यादरम्यान एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र ही त्याची प्रेयसीसोबतची शेवटची भेट ठरली आहे.

हे प्रकरण झारखंडची राजधानी रांची येथील आहे. शुक्रवारी सकाळी साधारण 11.30 दरम्यान जेव्हा कुचू गावातील शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबड उडाली. येथील शेतात काही महिला काही निमित्त शेतात गेल्या होत्या तेथे शेताजवळील एक खड्ड्यात तरुणाचा मृतदेह पाहिल्यानंतर महिलांचा भीतीने थरकाप उडाला.

संबंधित - बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे 'या' देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

महिलांनी लागलीच गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात हा मृतदेह ताब्यात घेतला. मृत झालेल्या तरुणाचे नाव मनोज असं आहे. सांगितले जात आहे की, मनोज आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत संशय आला. यानंतर कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने मनोजची अत्यंत निघृणपणे हत्या केली.

मनोजची हत्या गळा कापून करण्यात आली. या हत्येमध्ये कोण कोण सहभागी होतं याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलिसांनी मनोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून तरुणीच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. मनोजची गळा चिरुन त्यांची हत्या केल्यानंतर त्याला शेतातील एका खड्ड्यात टाकून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित - अरे देवा...नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोना, एकाच घरातला चौथा रुग्ण

First published: March 27, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या