• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • उष्टा ग्लास माठात बुडवला म्हणून 8 वर्षांच्या मुलाला जमिनीवर आपटून मारले, अकोल्याची घटना

उष्टा ग्लास माठात बुडवला म्हणून 8 वर्षांच्या मुलाला जमिनीवर आपटून मारले, अकोल्याची घटना

 वेदांतने पाणी प्यावयास ग्लास घेतला व उष्टा करून माठात बुडवल्याने संजय नवलकार याने त्यास काठी, फुंकणीच्या सहाय्याने मारहाण...

वेदांतने पाणी प्यावयास ग्लास घेतला व उष्टा करून माठात बुडवल्याने संजय नवलकार याने त्यास काठी, फुंकणीच्या सहाय्याने मारहाण...

वेदांतने पाणी प्यावयास ग्लास घेतला व उष्टा करून माठात बुडवल्याने संजय नवलकार याने त्यास काठी, फुंकणीच्या सहाय्याने मारहाण...

 • Share this:
  अकोला, 09 ऑगस्ट :  पिण्याच्या पाण्याच्या उष्टा ग्लास माठात बुडवल्याने जमिनीवर आपटून 8 वर्षीय बालकाची (killed 8-year-old boy) हत्या केल्याची दुर्दैवी घटना अकोल्याच्या (akola) तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर इथं घडली आहे.  शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीपासून विभक्त असलेली महिला 2 मुलांसह आरोपी संजय नवलकर  याच्या सोबत अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर  इथं राहत होती. तिच्यासोबत 10 वर्षाची मुलगी व 8 वर्षाचा  मुलगा वेदांत या दोन्ही मुलासह आरोपीच्या घरी वाडी अडमपूर येथे राहू लागली. शनिवारी ७ ऑगस्टला मृतक मुलाची आई शेतात गेली असताना घरी मुले व आरोपी होता. Google Drive किंवा Google Photos वरुन फोटो डिलीट झाले? असे करा रिकव्हर तहान लागली म्हणून वेदांतने पाणी प्यावयास ग्लास घेतला व उष्टा करून माठात बुडवल्याने संजय नवलकार याने त्यास काठी, फुंकणीच्या सहाय्याने मारहाण करून जमिनीवर आपटले. नंतर बाथरूममध्ये नेऊन त्याच्या छातीवर दगड ठेवला. त्याला वाचवण्यासाठी त्याची 10 वर्षीय बहीण गेली असता तिला देखील मारहाण केली. आई असं कसं करू शकते? 2 वर्षांच्या लेकीला इतकं मारलं की... मुलाची आई शेतातून परत आल्यावर जखमी अवस्थेत मुलाला उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास अकोला येथील रुग्णालयात हलवण्यास सांगितले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. त्यानंतर आईने पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल केली. शवविच्छेदन अहवालावरून आरोपी संजय नवलकार यास पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: