शोले पार्ट 2! एकतर्फी प्रेमवीराने चक्क प्रेयसीच्या घरासमोरील भिंत पाडली, कारण...

एकतर्फी प्रेमवीराने तिच्या घरासमोरची भिंत पाडल्याची घटना माजलगाव तालुक्यातील जायकोची वाडी येथे उघडकीस आली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 01:27 PM IST

शोले पार्ट 2! एकतर्फी प्रेमवीराने चक्क प्रेयसीच्या घरासमोरील भिंत पाडली, कारण...

बीड, 10 नोव्हेंबर : प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यासाठी पाण्याच्या टाकीवर जावून आत्महत्याची धमकी दिल्याचे चित्रपटात पाहिले असेल. पण माझ्यासोबत लग्न का केले नाहीस असं म्हणत प्रेयसीला शिवीगाळ करत एकतर्फी प्रेमवीराने तिच्या घरासमोरची भिंत पाडल्याची घटना माजलगाव तालुक्यातील जायकोची वाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मजनू तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जायकोची वाडी येथील 20 वर्षीय मुलगी माजलगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या गावातील योगेश सुभाष शेवाळे हा तरुण एकतर्फी प्रेमातून दोन वर्षापासून तिची छेड काढत होता. मुलीने दोन वर्षापूर्वी योगेशच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पण तरीदेखील त्याने मुलीला त्रास देण्याचं कमी केलं नाही.

गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता मुलगी कुटुंबीयांसोबत टीव्ही पाहत बसली असताना योगेश तिच्या घरी आला. माझ्यासोबत लग्न का केले नाहीस असं म्हणत शिवीगाळ करू लागला. त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने धक्का देऊन घरासमोरील मातीची लहान भिंत पाडली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी योगेशवर माजलगाव ग्रामीण पोलिसात गन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रेमातून आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने निराशेच्या भरात गळफास घेवून स्वतःला संपवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज शहरातील भवानी नगर भागात हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण केशव शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. केशव यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रेम प्रकरण आणि लग्नानंतरच्या वादातून गुन्हा घडल्याचा किंवा आत्महत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. पण पत्नी नांदायला येत नाहीत म्हणून नैराश्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. लग्नाला पाचच महिने होऊनही पत्नीला तिचे नातेवाईक माहेरी घेऊन गेले. तिला परत पाठवायला त्यांनी नकार दिला. तीन महिन्यांपासून वारंवार पत्नीला परत आणण्यासाठी केशव हे सासरी जात होते. मात्र, मुलीच्या वडिलांनी पाठवण्यास नकार दिला.

Loading...

मोठी बातमी - राजकारणात भुकंप: भाजपला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा

लक्ष्मणचे डोके दुखत असल्याने पत्नीच्या नातेवाइकांनी ' अगोदर लक्ष्मणचा उपचार करा. त्यानंतर आम्ही मुलीला नांदायला पाठवितो असा निरोप दिला होता. या प्रकारातून नैराश्य आल्याने लक्ष्मण यांनी घरी कोणी नसताना आतून दरवाजा लावून घेत घरातील लोखंडी खांबाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुलीच्या नातेवाईकांच्या हट्टापाई नैराश्याने ग्रासलेल्या लक्ष्मण यांनी शेवटी स्वतःला संपवून घेतले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love crime
First Published: Nov 10, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...