कल्याण, 31 डिसेंबर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार (rape) केला. मात्र तिच्यासोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी विवाह करत असताना बोहल्यावर चढण्याआधीच कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी (kalyan kolshewadi police) या भामट्या नवरदेवाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय उर्फ विक्की फ्रान्सिस असं या नवरदेवाचे नाव आहे. विक्कीने मॅरेज इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणींसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. तिला लग्नाचे आमिष देखील दाखवले होते. मात्र या तरुणीला अंधारात ठेऊन विक्की अमरावतीमध्ये दुसऱ्याच तरुणीशी विवाह करत होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. विक्की हा रेल्वेचा कर्मचारी आहे.
कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी परिसरात राहणाऱ्या विक्कीचे गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. अजयने या तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले शिवाय तिचा गर्भपात देखील केला होता. लग्नाचे आमिष दाखवून अजय हे कृत्य करत होता. या प्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
(Asia Cup: भारतीय अंडर-19 संघाने 8 व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले)
याच दरम्यान अजय हा दुसऱ्या तरुणीसोबत 29 डिसेंबरला लग्न करणार असल्याची माहिती तरुणीला मिळाली. तरुणीने याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार कोळशेवाडी पोलिसांचे पथक अमरावती येथील बडनेरा येथे पोहचले आणि लग्नाची तयारी सुरू असतांना विक्कीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
(Shocking! थेट वाघाच्या जबड्यात तरुणाने दिला हात आणि...; थरकाप उडवणारा VIDEO)
'पीडित तरुणीसोबत अजय उर्फ विक्की फ्रान्सिस याचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान या पीडित तरुणीचा अजयने विश्वास संपादन केला. प्रेमसंबंध असल्यामुळे अनेक वेळा त्यांचे शारीरिकसंबंध आले होते, यातून ही पीडित तरुणी गर्भवती देखील राहिली होती. मात्र अजयने तिला गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा अवैधरित्या गर्भपात केला. दुसऱ्या तरुणीशी अजय लग्न करत असल्याची माहिती मिळाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपास सुरू असताना पीडित तरुणीने आरोपी हा अमरावतीत बडनेरा या ठिकाणी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याची माहिती दिली. त्यावेळी आमच्या पोलीस पथकाला पाठवून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: कल्याण