केवळ आश्वासनं..रस्ते, पाणी या सुविधा न दिल्याने संगमनेरमध्ये या गावात मतदानावर बहिष्कार

केवळ आश्वासनं..रस्ते, पाणी या सुविधा न दिल्याने संगमनेरमध्ये या गावात मतदानावर बहिष्कार

संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील पेमरेवाडी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आजवर नेत्यांनी केवळ आश्वासने दिली, रस्ते, पाणी यासह मुलभूत सुविधा न दिल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

हरीश दिमोटे (प्रतिनिधी)

शिर्डी, 29 एप्रिल- लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज (ता.29) देशात होत आहे. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील पेमरेवाडी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आजवर नेत्यांनी केवळ आश्वासनं दिलीत. रस्ते, पाणी यासह मुलभूत सुविधा न दिल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे अधिकारी काल गावकऱ्यांच्या भेटीला गेले आणि मतदानावर बहिष्कार न घालण्याची विनंतीही केलीय. मात्र, गावकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे. 191 मतदार असलेल्या पेमरेवाडी येथील एकही नागरीक मतदान केंद्रावर फिरकला नसल्याने केंद्रावर शुकशुकाट आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील त्यांच्या जोर्वे गावात सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. त्यामुळे शिर्डीची लढाई सेनाविरूद्ध काँग्रेस अशी होण्याऐवजी विखेविरूद्ध थोरात अशी रंगली आहे. मात्र, कोणता नेता कुठंही गेला तरी काही फरक पडत नाही अशी विखे पाटलांवर टीका करत शिर्डीची जागा काँग्रेसच जिंकणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपले बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 15 विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, हिना गावित आणि हेमंत गोडसे यांची आज परीक्षा आहे. तर दुसरीकडे, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, कन्हैय्या कुमार, अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, उपेंद्र कुशवाहा, वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचंही भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

VIDEO: कोल्ह्यानं किती लबाडी करावी याला मर्यादा असते- शिवाजीराव अढळराव पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading