नेवाश्यात आलेल्या पुरात तरुण गेला वाहून, शोधमोहीम सुरू

नेवाश्यात आलेल्या पुरात तरुण गेला वाहून, शोधमोहीम सुरू

  • Share this:

10 जून : नेवासा तालुक्यात जोरदार पावसाने ओढ्याला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे. नेवाश्यातल्या मारूतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला काल संध्याकाळी अक्षय अशोक गवळी हा 22 वर्षांचा तरूण वाहून गेला आहे. रात्री उशीरा पर्यंत त्याचा शोध चालू होता.

अक्षय हा शहरात बांधकाम कारागीर आहे. आज दुपारी झालेल्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मारुतीनगर हे शहरापासून दोन किमी अतंरावर आहे. तिकडे जाण्यासाठी ओढा पार करुन जावे लागते.

जोरदार पावसाने या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. संरक्षक दगडाच्या वरुन पाणी वाहत होते. अक्षय गवळी व त्याचे साथीदार कामावरुन घरी चालले होते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अक्षयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाने तो खोल पाण्यात जाऊन तसाच वाहत पुढे गेला.

नागरिकांनी आणि प्रशासनाने रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीची वेळ आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा नदीपर्यंत शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही

दरम्यान, नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने तो पूल पाण्याखाली वाहून गेल्याने भानसहिवरेकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. माळीचिचोंऱ्याचा संपर्कही तुटला आहे.

First published: June 10, 2017, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading