मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नववीतल्या मुलाने लावून घेतला गळफास

मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नववीतल्या मुलाने लावून घेतला गळफास

मोबाईल दिला नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यवतमाळच्या केळापूर इथे हा गंभीर प्रकार घडला आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 30 नोव्हेंबर : सध्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. मोबाईल दिला नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यवतमाळच्या केळापूर इथे हा गंभीर प्रकार घडला आहे.

सौरभ संतोष भोयर या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांना मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला. पण वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचलत या विद्यार्थ्याने शेतातल्या झाडाला गळफास लावून घेतला आहे.

सौरभ पाटणबोरी इथल्या छत्रपती शाळेत शिकत होता. त्याला मोबाईल हवा होता. आपल्या कापसाचे पैसे आले की मोबाईल घेऊ असं आश्वासन वडिलांनी दिलं होतं. पण कापसाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वडिल चिंतेत होता.

कापसाला भाव मिळाला नाही म्हणून आर्थिक अडचणीत असलेल्या वडिलांनी आता मोबाईल घेऊ शकत नाही असं सांगितल्यावर मुलाला हे काही सहन झालं नाही. फक्त मोबाईलच्या हट्टापायी मुलाने गळफास लावला आहे.

या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सौरभचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर एका छोट्याश्या यंत्रासाठी माझा मुलगा सोडून गेल्याची खंत या हवालदिल माता-पित्यांच्या मनात आहे.

खरंतर आताची तरुणाई मोबाईलच्या अखंड प्रेमात बुडाली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचा जर असा उद्रेक होणार असेल तर मोबाईलचा वापर आणि गैरवापर काय आहे हे तुमच्या मुलांना आताच सांगणं महत्त्वाचं आहे.

मोबाईल कशासाठी आणि कधी वापरला पाहिजे यावर त्यांना आतापासून ज्ञान द्या. त्यांना महागड्या वस्तू घेऊन देण्याची आश्वासन देण्यापेक्षा ते आता का घेऊ नये याचा फरक समजवला तर कदाचित असा प्रकार आपल्याला थांबवता येऊ शकतो.

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या

First published: November 30, 2018, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading