धक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...!

धक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...!

निर्दयी मुलाचं कृत्य वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल पण काही शुल्लक कारणावरून एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 15 नोव्हेंबर : आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याचा अंत करणारी एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. निर्दयी मुलाचं कृत्य वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल पण काही शुल्लक कारणावरून एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली आहे.

नाशिकच्या वडाळा गावातील ही खळबळजनक घटना घडली आहे. घरात आईशी शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यातून मुलाने स्व:च्या आईची हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

एखादा मुलगा आपल्या आईची हत्या करू शकतो का हा प्रश्न इतका अस्वस्थ करतो पण हे सत्यात घडलं आहे.  रुकसाना कमरुद्दीन शेख असं या मृत महिलेचं नाव आहे. रुकसाना यांना त्यांच्याच पोटच्या गोळ्याने हात-पाय बांधून त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

कौटुंबिक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून मुलाने टोकाचं पाऊल उचलत स्व:ताच्याच आईचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

तर आरोपी मुलगा अल्लाउद्दीन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मीच माझ्या आईची हत्या केली असल्याची कबुली मुलाने पोलिसांना दिली आहे.

अल्लाउद्दीनने त्याच्या आईला बांधून ठेवलं आणि त्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

VIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा

First published: November 15, 2018, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading