SPECIAL REPORT : 'माझा मुलगा परत द्या', 50 रुपयांच्या चोरीच्या आरोपाने चिमुरड्याची रेल्वेसमोर उडी!

SPECIAL REPORT : 'माझा मुलगा परत द्या', 50 रुपयांच्या चोरीच्या आरोपाने चिमुरड्याची रेल्वेसमोर उडी!

चोरीचा आरोप सहन न झाल्यानं सहावीतल्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

  • Share this:

सचिन जिरे,प्रतिनिधी

औरंगाबाद, 19 ऑक्टोबर : चोरीचा आरोप सहन न झाल्यानं सहावीतल्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. सूरज क्षीरसागरवर दुकान चालवणाऱ्या महिलेनं 50 रुपये चोरल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज क्षीरसागरच्या आत्महत्येमुळं त्याच्या आई-वडिलांवर मोठा आघात झाला. एकुलता एक मुलगा जग सोडून निघून गेल्यानं सूरजच्या आईचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. सूरजच्या आईची ही अवस्था पाहून काळजाचं पाणी झालं.

एक सुखी कुटुंब सूरजच्या आत्महत्येनं उद्ध्वस्त झालं. सूरजच्या घराशेजारी किराणा दुकान चालवणाऱ्या सरला धुमाळ या महिलेनं सूरजवर पैसे चोरळ्याचा संशय घेतला. सूरजच्या शाळेत जाऊन तिनं पैसै चोरल्याचा आरोप केला. यामुळे अपमानित झालेल्या सूरजनं रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मूल गमवावं लागल्यानं त्याच्या आईनं सूरजला परत आणा असा टाहो फोडला. तर ज्याच्यासाठी मेहनत घेत होतो, तोच जगात राहिला नाही असे काळजाला पिळवटून टाकणारे उद्गगार सूरजच्या वडिलांनी काढले.

पोलिसांनी सूरजच्या आत्महत्येचा तपास सुरू केला असून सरला धुमाळ या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सूरजचं चांगलं शिक्षण देता यावं यासाठी क्षीरसागर दांपत्य त्यांचं गाव सोडून आले. औरंगाबादमध्ये मोलमजुरी करून ते सूरजला शिकवत होते. मात्र, चोरीच्या एका आरोपामुळे सर्वच संपलं.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading