• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • दोन चिमुकल्या बहिणींवर नराधमाचं विकृत कृत्य; संतापजनक घटनेनं जळगाव हादरलं!

दोन चिमुकल्या बहिणींवर नराधमाचं विकृत कृत्य; संतापजनक घटनेनं जळगाव हादरलं!

Rape in Jalgaon: जळगावातील एका तरुणाने दोन चिमुकल्या बहिणींना आपल्या वासनेचा शिकार बनवलं (Rape on 2 minor sisters) आहे.

  • Share this:
    जळगाव, 22 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड  वाढ झाली आहे. काल अहमदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या (Minor girl rape and murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित मुलीचे आई-वडील शेतात गेल्यानंतर, नराधमांनी पीडितेच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचारानंतर तिची गळा आवळून हत्या केली आहे. महिला अत्याचाराची ही घटना ताजी असताना, आता जळगावात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने दोन चिमुकल्या बहिणींना आपल्या वासनेचा शिकार बनवलं (2 minor sisters rape in jalgaon) आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलींच्या घरात शिरून त्यांच्यावर अत्याचार केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो (POCSO) कलमाअंतर्गत गावातील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगावातील नशीराबाद पोलिसांनी संशयित आरोपीला अटक (Suspect arrest) केली असून या घटनेचा तपास केला जात आहे. हेही वाचा-मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना जळगाव जिल्ह्याच्या नशीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुली 6 आणि 7 वर्षांच्या आहेत. पीडित मुली नशीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहेत. बुधवारी सायंकाळी त्याच गावातील एक तरुण पीडित मुलींच्या घरी आला होता. यावेळी घरात चिमुकल्या मुलींव्यतिरिक्त कोणी नव्हतं. हेही वाचा- आई-वडील शेतात जाताच अल्पवयीन मुलीवर साधला डाव; बलात्कार आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं! यावेळी आरोपीनं संधी साधून पीडित मुलींवर त्यांच्याच घरात अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. पण चिमुकल्या बहिणींनी त्याच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. हा संतापजनक प्रकार कळताच, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी नशीराबाद पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पीडित कुटुंबीयांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नशीराबाद पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: