लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं; आरोपी ताब्यात

लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं; आरोपी ताब्यात

लग्नास नकार दिल्यामुळे उसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा इथं घडली आहे.

  • Share this:

29 डिसेंबर : बीडमध्ये आगीचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नास नकार दिल्यामुळे उसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा इथं घडली आहे. यात पीडित मुलगी 80 टक्के भाजली असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. स्वाराती रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींमध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. पोलिसांनी संबंधीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

प्रज्ञा ऊर्फ सोनाली सतीश मस्के असं या पीडित मुलीचं नाव आहे. ती १७ वर्षांची आहे. ती सध्या लोखंडी सावरगाव येथील महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकत आहे. या मुलीचे आई-वडील हे ऊसतोडणीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे ती तिच्या आजी आणि दोन भावांसह सोनवळा इथंच स्वतःच्या घरी राहत होती. मागील आठवड्यात गावातल्याच महादेव जालिंदर घाडगे या तरुणानं प्रज्ञाला लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु तिनं लग्नाला नकार दिला. यावरूनच या तरुणाने ती घरी एकटीच असल्याचा फायदा घेत दुपारी  बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, आणि सुवर्णा बबन मस्के यांच्यासह तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारला. त्यानंतर बबन मस्के आणि कविता घाडगे या दोघांनी घरामध्ये घुसून प्रज्ञाचे दोन्ही हात बांधले. महादेव घाडगे यानं जवळच ठेवलेला डब्ब्यातून तिच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि सुवर्णा बबन मस्के हिने काडी ओढून प्रज्ञाला पेटवून दिलं. यानंतर या चौघांनीही तिथून पळ काढला.

जीवाच्या आकांताने प्रज्ञानं आरडाओरडा केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावतही आले पण तोपर्यंत तिच्या शरीराने पेट घेतला होता. आजूबाजूच्या लोकांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केलं. प्रज्ञा सध्या आयुष्याशी झुंज देत आहे.

First published: December 29, 2017, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading