मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यात घडला भीषण अपघात

वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यात घडला भीषण अपघात

मात्र या अपघातामुळे वाहतुकीचे नियम पाळणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे बीड जिल्ह्यात असे अपघात मोठ्या प्रमाणात घडत असून वाहतुकीच्या नियमांचे संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

बीड, 27 ऑगस्ट : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरील दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात अरुण जगन्नाथ शेजूळ ( वय 65 वर्ष, रा . आबेगाव ), नंदकुमार संतराम महिपाल ( वय 38, रा . शिंदेवाडी ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की डोक्याला मार लागल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.

माजलगावाहून खामगाव- पंढरपूर महामार्गावरून अरुण शेजूळ हे स्कूटीवरून शेतात जात होते. रिलायन्स पंपाच्या बाजूला असलेल्या शेतात जाताना त्यांनी स्कूटी अचानक वळविली. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या नंदकुमार महिपाल यांच्या युनिकॉर्न दुचाकीची स्कूटीला धडक बसली. पाठीमागून येणारी दुचाकी भरधाव वेगात असल्याने मोठा अपघात होऊन दुचाकीवरील दोघेही सिमेंट रस्ता असलेल्या महामार्गावर पडले. यामुळे दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे पाहून पेट्रोल पंपावरील लोकांनी दोघांनाही तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. अरुण शेजूळ सेवानिवृत्त अभियंता हे जलसंपदा विभागात कार्यरत होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसायात रमले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हे ही वाचा-पुण्यात संरक्षण भिंत कोसळून एकाचा मृत्यू;बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे घडला प्रकार

मात्र या अपघातामुळे वाहतुकीचे नियम पाळणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे बीड जिल्ह्यात असे अपघात मोठ्या प्रमाणात घडत असून वाहतुकीच्या नियमांचे संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. यातच आरटीओ कार्यालयाकडून वाहतूक परवाना देताना चाचणी देखील केली जात नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे वाहतुकीचे नियम पाळूनच रस्त्यावरती वाहन चालवणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Beed news, Road accident