भयंकर! 'त्या' हत्येचं गूढ उकललं, अनैतिक संबंधातून सूनेनंच केला सासूचा खून

भयंकर! 'त्या' हत्येचं गूढ उकललं, अनैतिक संबंधातून सूनेनंच केला सासूचा खून

राधाला तिच्या सासूनं नको त्या अवस्थेत एका पर पुरुषासोबत पाहिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: बोरीवली येथे 24 ॲाक्टोबरच्या रात्री 57 वर्षीय महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. महिलेचा हत्या एका माथेफिरूनं केली, असं वळण देवून पोलीस तपास भरकवटला गेला होता. पण पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच हत्येचे कारण आणि हत्या करणारे आरोपी कोण आहेत? हे समोर आलं. पैसा आणि अनैतिक संबंधातून सूनेनंच सासूचा खून केल्याचं समाजताच पोलिसही चक्रावून गेले.

शालूबाई लाके असं मृत महिलेचं नाव होतं. बोरीवलीत राहणाऱ्या शालू यांची 24 ॲाक्टोबरच्या रात्री रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली होती. चेहरा दगडाने ठेचून त्यांची हत्या केली होती.

हेही वाचा...स्वबळावर भगवा फडकवणार! हे मी 30 वर्षांपासून ऐकतोय, शरद पवारांचा सेनेला टोला

कोणी तरी अज्ञात माथेफिरुने काहीच कारण नसताना शालू यांची हत्या केली असेल अशी चर्चा सुरु झाली. पोलिसांनी त्या दृष्टीनं तपासही सुरु केला होता. पण अचानक पोलिसांना एक माहिती मिळाली ज्याआधारे पोलिसांनी चौकशी सुरु केली आणि शालू लाके यांच्या हत्येला वेगळे वळण मिळताच सासू, सून, गरबा आणि दगड या गुंतागुतीच्या हत्येचा उलघडा झाला.

शालूबाई लाके यांच्या हत्येपूर्वी त्यांची सून गरबा खेळायला घराबाहेर पडली होती. पण कोरोनाच्या काळात गरबा खेळण्यावर बंधने असल्याने शालूबाई यांची सून नेमकी कुठे गेली असावी, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. शालू यांच्या सूनेनं घरात आणून ठेवलेल्या दगडानेच शालू यांची हत्या केली होती.

पोलिसांनी शालू यांची सून राधा लाके हिला ताब्यात घेतलं, पोलिसी खाक्या दाखवताच राधाने हत्या कशी केली ते पोलिसांना सांगितले. अगदी फिल्मी स्टाईल शालूने तिच्या सासूच्या हत्येचा कट रचला होता. राधा ही शालू यांची सगळ्यात लहान सून. राधाला तिच्या सासूनं नको त्या अवस्थेत एका पर पुरुषासोबत पाहिलं होतं. आणि राधाचा नवरा कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. तो आल्यावर त्याला सर्व प्रकार सांगेन, असं सासूनं राधाला बजावलं होतं.

आता आपले काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर राधानं आपला प्रियकर अण्णा माने याच्या मदतीनं सासूच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिनं घरात एक मोठा दगड आणून ठेवला होता. रात्री सासू घरात एकटीच असताना गरबा खेळायला जाते, असं सांगून घराचा दरवाजा उघडाच ठेवून बाहेर गेली. जेणेकरुन तिचा प्रियकर अण्णा मानेला घरात शिरता येईल. ठकल्याप्रमाणे अण्णा घरात शिरला आणि राधानं घरात आणून ठेवलेल्या दगडाने ठेचून राधाची सासू शालूबाईची निर्घृण हत्या करुन फरार झाला.

हेही वाचा..घरात बसून बापलेकं छापत होते 200 रुपयांच्या बनावट नोटा, असा झाला पर्दाफाश

दरम्यान, गुन्हेगार कितीही सराईत असला तरीही तो काही ना काही तरी सुगावा मागे सोडून जातो. इथे तर सून भला मोठा दगडच पुरावा म्हणून मागे सोडून गेली होती. ज्यामुळे सुनेनं सासूच्याच हत्येचा रचलेला कट उघडकीस आला. आणि याचमुळे सासू, सून, गरबा आणि दगड यात गुंतलेल्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला.

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 5:16 PM IST

ताज्या बातम्या